कोंबडी वाहतुक करणारा टेम्पो पलटी होवून एक जखमी

2

विलवडे येथील घटना;गाडीचे नुकसान,सुदैवाने अनर्थ टळला

बांदा ता.०१:
गारगोटीहून (जि. कोल्हापूर) म्हापसा-गोवा येथे कोंबडीची वाहतूक करणारा टेम्पो विलवडे-टेम्बवाडी येथील खांबदेव मंदिर नजीक आज पहाटे अपघातग्रस्त झाला. यामध्ये चालक सागर पांडुरंग सावंत (रा. म्हापसा) हे किरकोळ जखमी झालेत. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झोपेत रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो रस्त्यालगत गटारात जाऊन कोसळला. सुदैवाने या अपघातात मोठा अनर्थ टळला.

3

4