पोलिस अधिक्षकांची माहीती;पिस्तूल काडतुसासह सोने वितळण्याचे मशीन जप्त
सावंतवाडी ता.०१: घरफोडी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या प्रकाश पाटील रा.गोवा या चोरट्याने जिल्ह्यात तब्बल आठ ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आहे.त्याच्याकडून ५६ तोळे सोन्यासह एक पिस्तुल,काडतुस आणि सोने वितळण्याचे मशीन अशा विविध वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात घडलेल्या आणखीन काही चो-यात त्याचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही.असा संशय सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी आज येथे व्यक्त केला.येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र मुळीक,पोलीस निरीक्षक सुनील धनावडे,राजेंद्र शेळके आदी अधिकारी उपस्थित होते.