टेम्पो ट्रॅव्हलरची बैलगाडीला धडक ; दोन बैल गंभीर जखमी…

2

कुणकावळे बागवाडी येथील घटना ; उडी मारल्याने बैलगाडी चालक बचावला…

मालवण, ता. १ : भरधाव वेगाने जाणाऱ्या पुण्यातील पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीने समोरून येणाऱ्या बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. यात बैलगाडी लगतच्या घळणीत जात कोसळल्याने दोन्ही बैल गंभीर जखमी झाले. बैलगाडीतील प्रसाद साळकर यांनी बैलगाडीतून उडी मारल्याने सुदैवाने बचावले. हा अपघात आज सकाळी साडे सहा वाजता कुणकावळे बागवाडी येथील वळणाच्या रस्त्यावर घडला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

4

4