इंग्लिश स्पिकिंग डे चा शुभारंभ ; सुकळवाड शाळेत उद्घाटन…
मालवण, ता. १ : इंग्लिश स्पिकिंग डे च्या या पंचायत समितीच्या जिल्ह्यातील पहिल्या उपक्रमाचा शुभारंभ आज सुकळवाड केंद्र शाळेत झाली. या उपक्रमात सभापती अजिंक्य पाताडे यांनी
इंग्रजीचा तास घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजीचा लळा लागावा, इंग्रजीची भीती नाहिशी व्हावी. इंग्रजीत बोलण्याचा सराव व्हावा म्हणून मालवण पंचायत समितीने तालुक्यातील जि.प.शाळांतून प्रत्येक शनिवारी ‘इंग्लिश स्पिकिंग डे’ उपक्रम साजरा करावा असे निश्चित केले आहे. सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती सतीश ऊर्फ राजू परुळेकर व गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे संकल्पनेतून हा उपक्रम १ फेब्रुवारी पासून सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले.
आज सुकळवाड़ केंद्रशाळेत या उपक्रमाचा शुभारंभ जि. प. महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसरपंच स्वप्निल गावडे, केंद्रप्रमुख मारुती गावडे, शाळेचे मुख्याध्यापक तसेच सहकारी शिक्षकांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी सभापती अजिंक्य पाताडे यांनी इयत्ता सहावीच्या वर्गात इंग्लिश स्पिकिंग संदर्भात तास घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या अभिनव उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांनी कौतुक केले. तसेच तालुक्यातील शिक्षकांनीही या उपक्रमाचे उत्साहाने स्वागत केले आहे. आता प्रत्येक शनिवारी शाळांमधुन इंग्लिश बोलण्याचा सराव आढळून येणार आहे. शाळांमधुन या उपक्रमाची अंमलबजावणी होते की नाही याचीही पडताळणी प्रशासन यंत्रणेमार्फत केली जाणार आहे.