संत गाडगेबाबा भाजी मंडईचे काम डिसेंबर पूर्वी सुरू करू…

2

संजू परब;आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या माध्यमातून हेल्थफार्म चालविण्याचा विचार…

सावंतवाडी ता.०१: येथील संत गाडगेबाबा भाजी मंडई उभारण्याचे काम कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर पूर्वी सुरु करु.त्या इमारतीसाठीचा निधी उपलब्ध करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,असे आश्वासन नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिले.दरम्यान अनेक वर्षे रेंगाळलेला “हेल्थ फार्म” प्रकल्प आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.लवकरच याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल,असेही श्री.परब यांनी सांगितले.

नगराध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री.परब यांना एक महिना पूर्ण होत आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या काळात झालेली माहिती दिली.यावेळी सुनिल राऊळ,उमाकांत वारंग,प्रल्हाद तावडे,अजय गोंदावले आदी उपस्थित होते.
ते म्हणाले,आपण नगराध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर सावंतवाडी शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत.त्यासाठी शहरातील बावीस शौचालय स्वच्छ करण्यावर भर दिला आहे.आता नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.नगरपालिका कार्यालयाचे नूतनीकरण सुरू आहे.बाजारपेठेत फरश्या बसविण्यात आले आहेत.तेथील छपराची दुरुस्ती करण्यात येणार आहे.शिल्पग्राम येथे हॉटेल सुरू केलेल्या संबंधित कंपनीने १४ लाख म्हणून रुपये तीन महिन्याचे भाडे भरले आहे.काही दिवसांनी उर्वरीत रक्कम ते भरणार आहेत.शहरात आता स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.हेल्थ फार्म परिसरात दारूच्या तब्बल दोन हजार बाटल्या आढळून आल्या त्यामुळे त्या ठिकाणी पूर्णवेळ पहारेकरी ठेवण्यात आला आहे.शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यावर,गुरांवर कारवाई करण्यात येणार आहे.

1

4