Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
- वैभववाडी,ता.०२: कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथे ए. ई. एल. पी कार्यक्रमांतर्गत ब्राॕयलर पोल्ट्री फार्मचे उद्घाटन संस्थेचे संचालक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव सुधाकर येवले, प्राचार्य डॉ. एस. आर. उघडे, मोड्युल इनचार्ज प्रा. जी. व्ही. गावडे आदी कॉलेजचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी सचिन दोलताडे, राहूल सानप, शुभम लाड, श्रेया मांगोरे यांच्यासह गटाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमांतर्गत ३०० पिलांचे संगोपन तसेच वाढ, पश्यात विक्री करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे. सदर पोल्ट्रीला तालुक्यातील शेतकरी तसेच व्यवसाय करणाऱ्या तरूण विद्यार्थ्यांनी अवश्य भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.