धनावडेंचा सत्कार; घरफोडीतील आरोपीला जेरबंद केल्याने कौतुकाची थाप…
सावंतवाडी ता.०२: घरफोडीतील आरोपीला जेरबंद करण्याबरोबरच जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात यशस्वी ठरलेल्या सिंधुदुर्ग पोलीस टीमचा येथील राष्ट्रवादी काँग्रेसकडून कौतुक करण्यात आले.यावेळी सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना पुष्पगुच्छ देऊन पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रांतिक सदस्य उदय भोसले, सुरेश गवस जिल्हा सरचिटणीस,भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे सचिन पाटकर, गुरुदत्त कामत,शहराध्यक्ष सत्यजित धारणकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.