सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आयोजन;शिवा काशीद,बाजी प्रभूंचा मांडणार इतिहास..
सावंतवाडी ता.०२: येथील सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने दि.८ फेब्रुवारी रोजी येथील बॅ.नाथ पै सभागृहात शिवचरित्रकार डॉ.शिवरत्न शेट्ये यांचे व्याख्यान होणार आहे.यावेळी श्री.शेट्ये हे “गाथा ही…पराक्रमाची,नरवीर शिवा काशीद बाजीप्रभूची” या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी पन्हाळगडाचा दीर्घकालीन वेढा,त्यातून राजांची सुटका,प्रति’शिवाजी’ वीर शिवा काशीद यांचे समर्पण,घोडखिंड पावनहोईस्तोवर वीर बाजीप्रभूंनी दिलेली झुंज,राजे विशाळगडी पोहचणे,तत्पूर्वी आप्तस्वकीयांशी लढा हा सर्व थरारक, युद्ध नीतीचे कौशल्य यांसह स्वामिनिष्ठेचा रोमांचक इतिहास ते कथन करणार आहेत.यावेळी
सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधू मित्र प्रतिष्ठानच्यावतीने प्रवीणकुमार ठाकरे यांनी केले आहे.