स्काऊट-गाईडच्या माध्यमातून मानसीश्वर जत्रोत्सवात केली पुजा साहित्या विक्री…
वेंगुर्ले,ता.२: श्रमप्रतिष्ठा व केलेल्या श्रमाचा योग्य तेवढाच मोबदला घ्यावा ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी गाईड कँप्टन मुख्याध्यापिका श्रीम तन्वी रेडकर, कब मास्तर श्री रामा पोळजी, शिक्षक सौ.आपटे मॅडम, श्री.गुडुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील यश मोर्जे, शौर्य तारी, रोशन केळुसकर, ध्रुव गिरप, दीपराज तांडेल, पराग आरावंदेकर, महिमा केळुसकर, सानिका तांडेल,तनया कुबल,गंधाली केळुसकर,जिज्ञासा जाधव,रोशनी मोटे इ.मुलांच्या कब बुलबुल आणि स्काँऊट गाईड पथकाने स्काऊट व गाइडच्या माध्यमातून खरी कमाई या उपक्रमाअंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा मानसिश्वर जत्रोत्सव येथे पुजा साहित्य विक्री स्टाँल लावला आहे.
विद्यार्थ्यांच्या या खरी कमाई च्या स्टाँल ला भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून विद्यार्थी विनम्रपणे आपला स्टाँल हाताळताना दिसत आहे.
यावेळी वेंगुर्ले पंचायत समिती सभापती सौ अनुश्री कांबळी, जि.प.चे माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती तथा विद्यमान जि.प.सदस्य दादा कुबल, पंचायत समिती वेंगुर्ला शिक्षण विस्तार अधिकारी शोभराज शेर्लेकर, शा.व्य.स.अध्यक्ष दादा केळुसकर, ग्रामस्थ महेश मोर्जे नारायण तारी, शिवानंद आरावंदेकर सुभाष तांडेल,सर्व पालक यांनी या स्टाँल ला भेटी दिल्यात. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला सभापती सौ कांबळी यांनी प्रोत्साहन दिले असून भाविक, नागरीक यांनी या स्टाँलवरुन पुजा साहित्य खरेदी करुन मुलांना प्रेरणा व प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले आहे.