शिवसेना-भाजपात रंगला कलगीतुरा;मागणी करणारे लोबो “टार्गेट”…
पणजी ता.०२: गोव्यात सुरू असलेला मटका कायदेशीर करावा,अशी मागणी गोव्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी केली आहे.बेकायदेशीर रीत्या सुरु असलेला मटका कायदेशीर झाल्यास त्याचा फायदा राज्यातील तिजोरी वाढविण्यासाठी होऊ शकतो,असे त्यांनी म्हटले आहे.मात्र या विषयावरून शिवसेनेने त्यांना टार्गेट केले असून राम नावाच्या मार्गाने राजकारण करणारे भाजप आता वाम मार्गाने पैसे कमवण्याची भाषा करत आहेत,अशी टीका केली आहे.
यावरून शिवसेना व भाजपात जोरदार कलगीतुरा रंगला आहे.तर दुसरीकडे या मागणीमुळे मटका व्यवसायिकात आनंद आहे.तसे झाल्यास त्याचा निश्चितच फायदा गोव्यातील अनेक बुकींना होण्याची शक्यता आहे.