अज्ञातांवर गुन्हा दाखल; सुदैवाने काही चोरीला गेलेले नसल्याचे फिर्यादीचे म्हणणे…
कुडाळ ता.०२: गेले काही दिवस जिल्ह्यात धुमशान घालणाऱ्या चोरट्यांनी काल रात्रीच्या सुमारास कुडाळ येथील तब्बल दोन ठीकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला.यात फरशीच्या दुकानासह फायनान्सचे ऑफीस त्यांनी लक्ष्य केले होते.मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची तक्रार योगेश नाडकर्णी (रा. लक्ष्मीवाडी- कुडाळ) यांनी दिली.
त्यांनी तक्रारीत असे म्हटले आहे की,आपल्या अन्नपूर्णा एंटरप्राइजेस या फरशीच्या दुकानात अज्ञात चोरट्याने काल रात्री खिडकीचे गज कापून प्रवेश केला. व आत मध्ये असलेले ऑफिस टेबल फोडून तेथील सामान अस्ताव्यस्त टाकले,मात्र सुदैवाने काही चोरीला गेले नाही दरम्यान दुसरे चोरीचा प्रयत्न साई पॉइंट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कार्यालयात झाला आहे. याबाबतची तक्रार देण्यात आली.असून त्याची माहिती कर्मचारी समीर नाईक यांनी दिली आहे.याबाबतची माहिती ठाणे अमंलदार रामदास जाधव यांनी दिली.