शिरोडा येथील दुचाकी अपघातात रशियन पर्यटकाचा मृत्यू

2

वेगुर्ला ता ३
दुचाकीची धडक खांबाला बसल्यामुळे झालेल्या अपघातात रशियन पर्यटकाचा मृत्यू झाला.त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.ही घटना आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिरोडा राऊतवाडी येथे घडली.
त्याला वाचविण्यासाठी ग्रामस्थांसह त्याच्यासोबत असलेल्या परदेशी पर्यटकानी प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना त्याचे वाटेतच निधन झाले याबाबतची माहिती काँग्रेसचे युवा नेते सिद्धेश परब यांनी दिली

याबाबत अधिक माहिती अशी की शिरोडा वेळागर परिसरात संबंधित पर्यटक आपल्या सहकाऱ्यांसमवेत थांबला होता.दरम्यान पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आपल्या एका सहकाऱ्यांसमवेत तो गोवा केरीच्या दिशेने जात होता. परंतु रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाचा अंदाज न आल्यामुळे त्याची दुचाकी खांबाला धडकली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो तेथेच कोसळला.

हा प्रकार त्याच्या सोबत असलेला पर्यटकाने पाहिला आणि त्याने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो गंभीर अवस्थेत आढळून आला दरम्यान सहकार्याने बाजूला असलेल्या काही ग्रामस्थांचे दरवाजे ठोठावले परंतु पहाटेची वेळ असल्यामुळे तात्काळ कोणी बाहेर आले नाही. त्यामुळे पुन्हा तो सहकारी आपल्या मित्रांना सांगण्यासाठी वेळागर येथे निघून गेला.
तो पर्यत त्याठिकाणी काही ग्रामस्थांनी धाव घेतली यावेळी ग्रामस्थ अमित राऊत गौरव राऊत ,विठ्ठल राऊत ,विवेक पवार ,विनोद राऊत, सिद्धेश राऊत आलेत व त्यांनी त्वरित श्री बाबल गावडे व श्री सिद्धेश परब यांना झालेला प्रकार सांगितला व ॲम्बुलन्स साठी कळवले लगेच श्री बाबल् गावडे आणि श्री परब घटनास्थळी पोहोचले आणि त्या पर्यटकाला ॲम्बुलन्स मध्ये घातले त्याला शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन आले व श्री परब यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना कळवले व पोलीस निरीक्षक श्री शशिकांत खोत यांना घटनास्थळावरून संपर्क साधला. यावे शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे शिरोडा पोलीस स्टेशनचे श्री भिसे व श्री वेंगुर्लेकर यांनी घडलेल्या घटनेचा पंचनामा केला.

6

4