डेगवे येथील श्री देव स्थापेश्वराचा आज जत्रोत्सव…

2

सावंतवाडी ता.०३: ४८ खेड्यांचा अधिपती म्हणून ओळख असलेल्या डेगवे येथील श्री देव स्थापेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव आज होत आहे.या निमित्ताने मंदिरात सकाळी ७ वाजता अभिषेक,त्यानंतर वोटी भरणे,केळी ठेवणे, नवस बोलणे,नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी १२ वाजता श्री.प्रदिप विजय सासणे यांचा उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहण्याचा विश्वविक्रम कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर रात्री बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा महिमा दुर्दूरेश्वराचा हे पौराणिक नाटक होणार आहे.यावेळी सर्व भक्तगणांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

7

4