माधव भंडारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता सावंतवाडीत टोला…
सावंतवाडी.ता,०३: एनआरसी हा कायदा केंद्र शासनाने संविधानाचा आधार घेऊन तयार केलेला आहे.त्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी दोन्ही सभागृहानी दिली आहे. त्यामुळे कोणतेही राज्य अथवा मुख्यमंत्री हा कायदा नाकारू शकत नाही. असा टोला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मेळाव्यात केले.
दरम्यान नागरीकत्व कायदयाच्या विरोधात बोलणा-या लोकांना दुदैवाने नेमका हा कायदा काय हेच माहीत नाही,मात्र ही परिस्थिती बदलणे गरजेचे अशी भूमिकाही भंडारी यांनी आज येथे मांडली
सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला मार्गदर्शन करताना बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबई येथे झालेल्या सभेत काही झाले तरी महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही. अशी भूमिका घेतली होती. या भूमिकेला श्री भंडारी यांनी यावेळी विरोध केला ते म्हणाले जो कायदा तयार करण्यात आला आहे. तो काँग्रेसच्या काळातील आहे. तब्बल सहा वेळा त्यांच्या काळात बदल झाला होता. मात्र तो भाजप सरकारच्या काळात अंतिम करण्यात आला.त्यामुळे आज जर कोणी द्वेष भावना म्हणून या कायदयाला विरोध करत असेल तर ते चुकीचे आहे .काही झाले तरी येथील लोकांना आणि देशाला कायदा मान्य करावाच लागेल.त्यामुळे कोणी मुख्यमंत्री आणि राज्याने ठरवले तर त्या कायद्यात बदल होऊ शकत नाही.
यावेळी श्री तेली म्हणाले याठिकाणी आणि कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चा साठी पोलिसांनी एवढी गर्दी करणे चुकीचे आहे आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत असताना छावणीचे स्वरूप प्राप्त होते हे योग्य नाही अशी त्यांनी नाराजी व्यक्त केली कायद्यात कोणावर अन्याय होणार नाही त्यामुळे कोणी चुकीची माहिती देऊन त्याबद्दल बागुलबुवा करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही असे सांगून सावंतवाडीत कोकणात प्रथमच अशाप्रकारचा समर्थनार्थ मोर्चा आयोजित करण्यात युवक निशांत तोरसकर व स्वागत नाटेकर यांचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी माजी आमदार राजन तेली जिल्हा उपाध्यक्ष राजन म्हापसेकर अजित फाटक संदेश गावडे आदी उपस्थित होते.