2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी ता.०३: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ९ व १० फेब्रुवारी रोजी शिरोडा-रेडी (वेंगुर्ले) येथील यशवंत गडावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन शिवभक्ताकडून करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे शिरोडा-रेडी येथील यशवंत गडावर १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.तत्पूर्वी किल्ले परिसर स्वच्छ करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे.यावेळी मोहिमेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान याबाबतची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाधिकारी तथा शिवप्रेमी सागर नाणोसकर यांनी दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4