प्रदीप सासणे यांचा पुढाकार;विक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी
बांदा.ता,०३:
संतश्रेष्ठ बाळूमामा यांचे शिष्य व बेळगाव येथे व्यवसायाने लेखापरीक्षक असलेले ग्रीनिज बुक मध्ये नाव नोंद असलेले विश्वविक्रमवीर प्रदीप विजय सासणे यांनी भर दुपारी आग ओकणाऱ्या सूर्याकडे तब्बल अर्धा तास उघड्या डोळ्यांनी बघण्याचा विक्रम डेगवे येथे केला. ४८ खेड्यांचे दैवत असलेल्या श्री महालक्ष्मी-स्थापेश्वर देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा विक्रम हजारो भाविकांनी प्रत्यक्ष अनुभवला.
प्रदीप सासणे यांनी आतापर्यंत उघड्या डोळ्यांनी सूर्य पाहण्याचे हजारो कार्यक्रम केले आहेत. भर दुपारी तळपणाऱ्या सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा कार्यक्रम होणार असल्याने भाविकांना देखील उत्सुकता होती. दुपारी १२ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा तास एक टक सासणे यांनी सूर्याकडे बघण्याचा विक्रम केला. यावेळी देवस्थानचे मानकरी व हजारो भाविक उपस्थित होते.