अनंतराज पाटकर ;छत्रपती राजे प्रतिष्ठानचा उपक्रम…
ओरोस ता.०३:
छत्रपती राजे प्रतिष्ठाण सिंधुदुर्ग-ओरोस यांच्यावतीने 19 व 20 फेब्रुवारी रोजी “शिवमहोत्सव 2020” ओरोस बुद्रुक येथील मुंबई-गोवा महामार्गालगत जिजामाता हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष अनंतराज पाटकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेवेळी शिवमहोत्सव 2020 कार्यक्रम समितीच्या सदस्या नेहा परब, मयूर राणे, नितिन ओरोसकर, भूषण शेलटे, इशा हडकर, प्रिटी फर्नांडिस, अदिती भोगले, रुचिता पटकारे, संजाली मालवणकर, भूषण परब आदी उपस्थित होते.
यानिमित्त 19 रोजी मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गवर शिव प्रतिमेचे पूजन, बाईक रॅली, मशाल रॅली, भव्य चित्ररथ, वेतोरे येथील सिंधुरत्न ढोल ताशा पथक असा सकाळच्या सत्रात कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज देखावा, उद्घाटन व उपस्थित पाहूंण्यांचे स्वागत व सत्कार, 10 प्रतिष्ठित शेतकऱ्यांचा सन्मान, पोवाडा, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित व्याख्यान व ग्रुप आणि सोलो नृत्य स्पर्धा होणार आहे.
20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी स्वर संगीत कार्यक्रम होणार आहे. कोकण सुंदरी 2020 चे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिली फेरी मराठमोळा पेहरावात होणार असून या फेरीनंतर खाद्य भ्रमंती कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर कोकण सुंदरीची दूसरी फेरी होणार आहे. यानंतर कृषि कॉलेजची मुले पोवाडा सादर करणार आहेत. यानंतर तीसरी व अंतिम फेरी होणार आहे. या फेरिनंतर स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. अधिक माहितीसाठी अनंतराज पाटकर 9284379299 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.