अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची ६ रोजी आढावा बैठक…

2

मराठा समाजातील युवक-युवतींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन…

ओरोस ता.०३: 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील युवक-युवतींकरिता महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने गुरूवार दि. 6 फेब्रुवारी रोजी दु 3 वा. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
याच दिवशी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक पतपेढी सभागृहात मराठा क्रांती मोर्चा व इतर मराठा संघटनांच्यावतीने मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळीही अध्यक्ष नरेंद्र पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा व इतर मराठा संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, मराठा समाजातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0

4