बुद्धांचा आदर्श बाळगल्यास वेगाने प्रगती होईल…

2

भिकाजी वर्देकर; सिंधुदुर्ग सेवानिवृत्त बौद्ध संघाचा प्रथम स्नेहमेळावा संपन्न…

कुडाळ ता.०३: आपल्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने भगवान बुद्धांचा आदर्श बाळगला पाहिजे,त्यासाठी बुद्धांच्या विचारांचे आचरण केल्यास आपली प्रगती नक्कीच वेगाने होऊ शकते,असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा,मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष भिकाजी वर्देकर यांनी येथे केले.सिंधुदुर्ग सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघाचा प्रथम स्नेह मेळावा येथील मराठा समाज सभागृहात पार पडला.याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गजानन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सूर्यकांत कदम उपस्थित होते. यावेळी संघाचे कार्याध्यक्ष अरविंद वळंजू,उपाध्यक्ष सुरेश कदम,खजिनदार विजय वेरकर,सचिव मोहन जाधव,जिल्हा बँकेत व्यवस्थापक दीपक पेंडुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आल्यानंतर सामुदायिक बौद्ध वदंना पार पडली.यानंतर प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थ्यांनी संगमित्रा पवार हिने संविधान वाचन करून सर्वांना शपथ दिली.त्यानंतर मार्गदर्शन करताना श्री.वर्देकर यांनी संघटनेचे महत्त्व विशद करून ध्येय निश्चित असेल तर संघटना संघशक्तीतून निश्चित उभारणी करता येते असा विश्वासही व्यक्त केला.

5

4