कणकवली, ता.3 ः सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यवाणी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम कणकवलीत रविवारी (ता.9) वाळकेश्वर मंगल कार्यालय मुडेडोंगरी येथे होणार आहे. याबाबतची माहिती वैश्य समाज कणकवली तालुकाध्यक्ष दादा कुडतरकर यांनी आज दिली.
रविवारी (ता.9) सकाळी साडे नऊ वाजता ध्वजारोहणाने मेळाव्याला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर वधूवर नोंदणी, उद्घाटन, मान्यवरांचे सत्कार, वधूवर परिचय, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, वैश्य समाज स्मरणिकेचे प्रकाशन आदी कार्यक्रम होणार आहेत. मेळाव्याचे उद्घाटन माजी वित्त व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते होईल. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे, हळदीपूर वैश्यगुरू सेवान्यास मुंबईचे अध्यक्ष अशोक नर, उद्योजक चंद्रकांत सदडेकर, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, वैभववाडी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांच्यासह रवींद्र जठार, दीपक अंधारी, सुनील पारकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हा आणि जिल्हाबाहेरील वैश्यबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दादा कुडतरकर यांनी आज केले.
जिल्ह्यातील वैश्यवाणी समाजाचा ९ फेब्रुवारीला कणकवलीत मेळावा
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES