Saturday, December 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedअपघात होऊच नयेत यासाठी काळजी घ्या

अपघात होऊच नयेत यासाठी काळजी घ्या

दिशा अंधारी ः प्रवासी संघटनेच्यावतीने मान्यवरांचा सत्कार

कणकवली, ता.3 ः वाहन चालवताना होणारी एक छोटीशी चूक स्वतःसह इतरांचे संसार उध्वस्त करू शकते. त्यामुळे अपघात होऊच नये यासाठीची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन कणकवली रोटरी क्लबच्या अध्यक्षा दिशा अंधारी यांनी आज केले.
कणकवली तालुका प्रवासी संघ आणि जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या संयुक्तपणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असलेल्यांचा सत्कार नगरपंचायत सभागृहात करण्यात आला. यात दिशा अंधारी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कदम, अँड.दीपक अंधारी, आनंद अंधारी, प्रा.महेंद्र नाटेकर, डॉ.शमिता बिरमोळे, यशवंत राणे, सुरेश पाटकर, अशोक करंबेळकर, अ‍ॅड.संदीप राणे, रवींद्र मुसळे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ.शमिता बिरमोळे, संदेश आबिटकर, शरद हिंदळेकर, विनायक मेस्त्री, संजय मालंडकर, लवू सावंत, संजय मोरे, पंढरी जाधव, सुभाष घाडीगावकर, श्री.चिपळूणकर आदींचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments