सावंतवाडी/योगिता बेळगावकर,ता.०४: शहरातील नागरिकांना वृत्तपत्रांचा वाचनाचा आनंद घेता यावा, यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेले वाचन कट्टे इतिहासजमा झाले आहेत. काल येथील वैश्यवाडा भागात असलेल्या वाचनकट्टा पालिकेने काढला गेला. काही दिवस हे वाचन कट्टे वापराविना धुळखात पडून होते. त्यामुळे अखेर पालिकेकडून ते काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरातील लोकांसाठी काही दिवसापूर्वी हे वाचन कट्टे उभारण्यात आले होते.यात शहरातील मुख्य ठिकाणी या कट्ट्याची उभारणी करण्यात आली होती. यात बाहेरचावाडा, वैश्यवाडा, गरड,सालईवाडा आदी विविध ठिकाणांचा समावेश होता.
मात्र नागरिकांचा आवश्यक तेवढा प्रतिसाद न लाभल्यामुळे हे कट्टे धूळखात पडले होते. काही दिवस ते सुरू होते. तत्कालीन नगरसेवक विलास जाधव यांनी ते कट्टे सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्याला म्हणावा तसा वाचकांचा प्रश्नच लावला नव्हता.