मराठा समाजातील युवक युवतींसाठी ६ फेबुवारीला ओरोसला मार्गदर्शन मेळावा ..
सिंधुदुर्ग,ता.४:अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेद्र पाटील प्रथमच जिल्ह्यात येणार आहेत.मराठा क्रांती मोर्चा व इतर समाजाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील युवक युवतीकरीता महामंडळाच्या विविध योजनेबाबत माहितीकरिता मार्गदर्शन मेळावा गुरूवार ६ फेबुवारी २०२० ओरस येथे ११.३० वाजता आयोजित केला आहे.या मेळाव्यास अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेद्र पाटील उपस्थित रहाणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या ऊपक्रमाअर्तगत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामडळाच्यातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील युवक युवतीकरीता महामंडळाच्या विविध योजनेबाबत माहितीकरिता मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्यास अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
सर्व मराठा समाजातील युवक युवतीनी उपस्थित रहावे असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्ह्य समन्वयक सिध्देश पवार यानी केले आहे.