Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी बाजारपेठेत अज्ञात चोरट्याने युवकाला लुटले...

सावंतवाडी बाजारपेठेत अज्ञात चोरट्याने युवकाला लुटले…

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल;पन्नास हजार चोरीला गेल्याची तक्रार…

सावंतवाडी/निखील माळकर.ता,०४: येथील भर बाजारपेठ अज्ञात चोरटयाने एका युवकाला लुटल्याचा प्रकार घडला आहे. त्याच्याकडे असलेले तब्बल पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार त्याने येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. निलेश बाळकृष्ण पालव वय २५ रा.माणगाव असे त्याचे नाव आहे.दरम्यान या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याच्यया विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की निलेश हा पैसे भरण्यासाठी येथील एका बँकेत आला होता.मात्र काही काम न झाल्यामुळे तो तिथून बाहेर पडला मात्र नारायण मंदिर परिसरात आला असता एका अज्ञात चोरट्याने त्याच्या खिशात ठेवलेली रोख रक्कम लुटली असे त्याचे म्हणणे आहे. याप्रकरणी त्याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक तपास हवालदार संजय कदम व प्रमोद काळसेकर करत आहेत.ही माहिती ठाणे अमंलदार दर्शन सावंत यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments