बेकायदा दारू वाहतूक प्रकरणात सत्तेतील लोकप्रतिनिधी…

2

राजन तेलींचा आरोप ;जिल्ह्यातील विविध मुद्द्यावर लक्ष देण्याची प्रशासनाकडे मागणी…

कणकवली,ता.०४: गोवा बनावटीची दारू अन्य राज्यात वितरित करणारे सत्तेतील काही लोकप्रतिनिधीचं आहेत.त्यांना संबंधित यंत्रणेचा आशीर्वाद आहे,असा आरोप करत त्यामुळेचं संबंधितावर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी मी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे,असे भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.

दरम्यान या मागणीसाठी भाजपाचे
नवनिर्वाचित १३ तालुकाध्यक्षांसह आज जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी आणि पोलिस निरीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांची भेट घेतली.या मागण्यांबाबत तात्काळ पाठपुरावा करण्यात यावा.अन्यथा आंदोलन करू असा इशारा आपण दिला आहे.असे तेली यांनी सांगितले.याबाबतची माहिती,श्री.तेली यांनी दिली.
ते म्हणाले,आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष घेऊन अधिकाऱ्यांना भेटलो,यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली आहे.या मागण्यांनमध्ये जिल्ह्यामध्ये अवैद्य धंदे सुरू असून त्यात व शासकीय अधिकारी आणि सत्तेतील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची भागीदारी आहे.त्याचा शोध घ्यावा.वाळू लिलाव न होताच कालावल खाडीतील वाळू उपसा सुरू आहे.त्याची चौकशी व्हावी.रेडियम साठी कंपनी नेमून आरटीओ कार्यालयाने भ्रष्टाचाराचा फार्स सुरू केला आहे.जिल्ह्यात कामे करणाऱ्या विविध ठेकेदारांकडून कामे अडवून ठेवण्याचा प्रकार सुरू आहे.त्यामुळे रस्त्याची अवस्था बिकट आहे.त्यामुळे ही कामे पुर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावा.अशा विविध मागण्यांबाबत आपण दोन्ही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी,अन्यथा आम्ही भाजपा म्हणून रस्त्यावर उतरू,असा इशारा श्री.तेली यांनी दिला असल्याचे सांगितले.

2

4