Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी बसस्थानकातच शिवशाहीला अपघात...

सावंतवाडी बसस्थानकातच शिवशाहीला अपघात…

मेकॅनिकल कडून प्रकार; पोलीस ठाण्यात नोंद नाही…

सावंतवाडी ता.०४: येथील आगारात काम करत असताना शिवशाही बसला अपघात झाला आहे.यात गाडीच्या दोन खिडक्यांसह पत्र्याचे नुकसान झाले आहे.हा प्रकार आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एका मेकॅनिकल कडून घडला.मात्र याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.
याबाबतची माहिती एका एसटी कर्मचा-याकडुन देण्यात आली.दरम्यान एरवी चालकाकडून एखादा किरकोळ अपघात झाल्यास पंचनामा व तक्रार करणारे एसटी प्रशासन या प्रकाराबाबत गप्प का ?, असा सवाल त्या कर्मचाऱ्यांकडुन करण्यात आला आहे.याबाबत एसटीचे अधिकारी तथा आगार व्यवस्थापक मोहनदास खराडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन नॉटरिचेबल होता.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी या प्रकाराबाबत दुजोरा दिला आहे.एका मेकॅनिकल कडून बस पंपावर घेत असताना हा अपघात घडल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments