गोठणे येथे अल्टो कारला अपघात…

2

 

आचरा, ता.४: आचरा – कणकवली मार्गावर कणकवलीच्या दिशेने जात असलेल्या अल्टो कार धोकादायक वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डाव्या बाजुस खाली ओढ्याच्या दिशेने जात अपघात झाला. हा अपघात दुपारी 03 वा. च्या दरम्यान गोठणे येथे अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. अपघाताची माहीती मिळताच गोठणे येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र चव्हाण व ग्रामस्थ सहकार्याला धाऊन गेले.
आचरा पिरावाडी येथुन चालक (ड्रायव्हर) सारंग हे पांढर्‍या रंगाची, स्वाती कोरगावकर यांची, मारुती अल्टो कार (एम. एच. 07 ए. बी. 1543) घेउन कणकवलीच्या दिशेने जात असतांना गोठणेवड यशवंतवाडी फाट्याकडील धोकादायक वळणावरील मोरीवर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डाव्या बाजुस, मोरीच्या खाली ओढ्यात गेली. या अपघातामध्ये कोणतीही इजा झालेली नाही . सदर ठीकाण हे अपघात क्षेत्र बनले आहे. वर्षातून चार ते पाच अपघात याठिकाणी झाले आहेत. आचरा मार्गाचे शासनाकडून नुतनीकरण करण्यात आले आहे. परंतु खड्ड्यात असलेल्या या मोरीवर शासन व राज्यकर्ते कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत की काय. हा प्रश्न वाहतुकदारांना व जनतेला पडला आहे. कणकवली आचरा मार्गावरील या ठिकाणी खड्ड्यात असलेल्या या मोरीची उंची वाढवून रस्ता सरळ करणे गरजेचे बनले आहे.
आज दुपारीच्या सुमारास कोरगांवकर यांचे चालक यांना किरकोळ दुखापत झाली, परंतु मोठ्या अपघातातून बचावले. अशा अजून किती वाहनधारकांना या जिवघेण्या मोरीवरुन जावं लागणार आहे. असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे . अपघात झाल्याचे समजताच शैलेंद्र चव्हाण, किर्लोस सरपंच प्रदिप सावंत, शिवसेना मालवण उपतालुका प्रमुख प्रशांत (बाबा) सावंत, अर्जुन लाड, संजय लाड, लोचन पालांडे व ग्रामस्थ यांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले होते.

3

4