ओएलएक्सवर चोरीचे कॅमेरे विकणाऱ्यांची निर्दोष मुक्तता…

2

बांदा येथे घडली होती घटना;चोरीत दोघांचा होता समावेश…

सावंतवाडी,ता.०५:  बांदा येथील फोटो स्टुडिओ फोडून चोरी केलेला माल ओएलएक्स या कंपनीवर विकल्याप्रकरणी सावंतवाडी न्यायालयाने दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
महेंद्र अवचटकर रा.अलिबाग व रोहन पाटील रा.पेण अशी या दोघांची नावे आहेत. याकामी अँड. सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले.
हा प्रकार जुन २०१८ मध्ये घडला होता. बांदा येथील फोटो व्यवसायिक गुरुराज कणबर्गी व अजित दळवी या दोघांचे फोटो स्टुडिओ फोडून या दोघा चोरट्यांनी तेथील कॅमेरे सिमकार्ड व अन्य साहित्य लंपास केले होते. तसेच ते साहित्य ओएलएक्स वर विकण्यासाठी ठेवले होते.
हा प्रकार उघड झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. याकामी न्यायालयाकडून तपासण्या झालेल्या साक्षीदारांत विसंगती आढळून आल्यामुळे त्या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

 

1

4