सावंतवाडीत ख्रिस्ती बांधवांच्या वधू-वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

2

सावंतवाडी ता.०५: कॅथॉलिक असोसिएशन व कॅथोलिक अर्बन को.ऑप क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ख्रिस्ती बांधवांच्या वधू-वर सूचक मेळाव्याला संभाव्य वधू-वरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या मेळाव्याचा शुभारंभ येथील नसरणी केंद्रात फादर मेल्विन पायस यांच्या हस्ते झाला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी.एफ.डॉन्टस जासिन्त लोबो,ग्रेगरी डॉन्टस,व्हिक्टर डिसोझा, मार्सेलिन डिसोझा, संचालक मार्टिन अल्मेडा, अगोस्तीन फर्नांडिस,विल्यम सालदाना,रिचर्ड डिसिल्वा, जॉनी फर्नांडिस,जेम्स बोर्जिस आदी उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी कोल्हापूर बेळगाव येथील संभाव्य वधू-वरांनी आपली उपस्थिती दर्शवली.

पी.एफ.डॉन्टस यांनी प्रास्ताविक करून संस्थेचा हेतू सविस्तर सर्वांना सांगितला. ते पुढे म्हणाले, पालकांना व संभाव्य वधू-वरांनी अशा कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्यक्ष आपल्या जोडीदार निवडण्यासाठी संस्थेचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, त्या संधीचा फायदा घ्यावा.संस्थेमार्फत जुळणार्‍या विवाहासाठी कोणाकडूनही कसलेही शुल्क आकारण्यात येणार नाही, याचीही कल्पना दिली.
कार्यक्रमाची सुरुवात वधू-वरांचा परिचय करून करण्यात आली. यावेळी बरेच वधू-वर व त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी मालवणहून सिस्टर निम्फा उपस्थित होत्या. त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.आभार रुयाज रॉड्रिक्स यांनी तर सूत्रसंचालन फ्रेंकी डॉन्टस यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कॅथोलिक पतसंस्थेच्या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

 

 

3

4