Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedकणकवली येथे भीषण अपघातात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू...

कणकवली येथे भीषण अपघातात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू…

दोन दुचाकीत अपघात; समोरील दुचाकी चालकावर गुन्हा दाखल…

कणकवली, ता.५ :
दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने कणकवली येथे झालेल्या
अपघातात निवृत्त पशुधन अधिकारी
डॉ. नामदेव पवार ( रा. नरडवे पायरवाडी ) यांचा मृत्यू झाला
ही घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. पवार हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात डॉ. पवार गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बध्यांची प्रचंड गर्दी झाली. स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात हलविले. परुंतु. उपचार सुरू असतानाच डॉ. पवार यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक रूग्णालयाबाहेर जमा झाले. डॉ. पवार यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत करताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. उत्तरीय तपासनीनंतर डॉ. पवार यांचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात येणार असून धडक दिलेल्या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहीत डॉ. पवार यांच्या नातेवाईकांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments