आरोग्याचा रथ हाकणारे चालक २२ महीने मानधनाविना

2

ठेकेदार कंपनीचा दुर्लक्ष;जिल्हा परिषद अध्यक्षांचे वेधले लक्ष..

ओरोस ता.०५: 
24 तास प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वाहन चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल 22 वाहन चालकांना गेल्या तिन महिन्यांपासून चे मानधन ठेकेदार कंपनीकडून दिले गेले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून आमचे मानधन मिळवुन द्यावे अशी मागणी प्रा आ केंद्रांवरील चालकांनी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्याकडे केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहन चालकांनी जी प अध्यक्षांना दिलेल्या लेखी निवेदनात, आम्ही सर्व जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधे वाहन चालक म्हणून कार्यरत असून, आम्ही 24 तास ही सेवा देत असतो. तरीही आम्हाला ठेकेदारकडून वेळेत आमचे मानधन दिले जात नाही. गेले तिन महीने आम्ही मानधनाविना आहोत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सदर ठेकेदारास संपर्क साधला असता त्यांची काहीच प्रतिक्रिया मिळत नाही. तरी आमचे मानधन लवकरात लवकर मिळावे., अशी विनंती केली आहे.

2

4