कणकवली, ता. 5 ः शिवसेनेच्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील जिल्हा महिला आघाडी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कार्यकारिणी बरखास्त झाल्याचे पत्र शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी प्रसिद्ध केले आहे. महिला कार्यकारिणी बरखास्त झाल्याचा निर्णय अचानक घेण्यात आला. त्याबाबतची कोणतीही माहिती नसल्याने काही महिला पदाधिकार्यांकडून नाराजीही व्यक्त झाली.
नुकताच शिवसेना पक्ष वाढीबाबतचा आढावा घेण्यात आला. यात कणकवली विधानसभा मतदारसंघात नव्या पदाधिकार्याच्या नेमणूका करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिवसेनेची कणकवली विधानसभा मतदारसंघातील महिला कार्यकारिणी बरखास्त केली जात असल्याचे शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी म्हटले आहे.



