बांद्यात सीएए कायद्याच्या समर्थनासाठी ८ फेब्रुवारीला भव्य रॅली..

2

देशप्रेमी नागरिक मंचाच्या वतीने आयोजन; ५ हजारहून अधिक नागरिक होणार सहभागी…

बांदा,ता.०६: येथील देशप्रेमी नागरिक मंचाच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनाकरिता शनिवार दिनांक ८ रोजी बांदा शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता कट्टा कॉर्नर येथून राष्ट्रगीत झाल्यानंतर रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर कट्टा कॉर्नर, गांधीचौक, उभाबाजार, तेलीतिठा, मोर्येवाडा, बांदेश्वर मंदिर येथून रॅली काढण्यात येणार आहे. कट्टा कॉर्नर येथे आनंदी मंगल कार्यालयात रॅलीची समाप्ती होणार आहे. कार्यालयात देशप्रेमी विचारवंत तथा हिंदू जनजागृतीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक जयंत जाधव हे कायद्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
या रॅलीत बांदा शहर व दशक्रोशीतील ५ हजार हुन अधिक देशप्रेमी ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. नागरिकत्व कायद्यातील तरतुदी आणि या कायद्यातील समाजात असणारे गैरसमज आणि वास्तव याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देशप्रेमी नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.

2

4