Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीत उभारण्यात येणाऱ्या कंटेनर थिएटरचे ११ फेब्रुवारीला भूमिपूजन...

सावंतवाडीत उभारण्यात येणाऱ्या कंटेनर थिएटरचे ११ फेब्रुवारीला भूमिपूजन…

संजू परब;आमदार नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती…

सावंतवाडी ता.०६: .आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून याठिकाणी खाजगी तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या कंटेनर थिएटरचे भूमिपूजन श्री.राणे यांच्या हस्ते ११ फेब्रुवारीला सायं.४:०० वा. करण्यात येणार आहे.येथील जिमखाना मैदान परिसरातील नियोजित जागेत हा थिएटर उभारण्यात येणार आहे,अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान यावेळी सावंतवाडीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहनही श्री.परब यांनी यांनी केले.

यावेळी नगरसेवक राजू बेग,सुधीर आडिवरेकर,आनंद नेवगी, परिमल नाईक,मनोज नाईक,दिपाली भालेकर आदी उपस्थित होते.
श्री.परब पुढे म्हणाले, नगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान आम्ही जो जाहीरनामा केला होता,त्याची पूर्तता करण्यासाठीचे प्रयत्न आमच्याकडून सुरू करण्यात आले आहेत.दरम्यान यातील महत्त्वाचा विषय म्हणजे सावंतवाडीकरांच्या मनोरंजनासाठी कंटेनर थिएटर देऊ,असा शब्द श्री.राणे यांनी येथील जनतेला दिला होता.त्याची जलद गतीने पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.याचाच पहिला टप्पा म्हणून या थिएटरचे भूमिपूजन ११ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे.येथील जिमखाना मैदान परिसरातील जागेत हा थिएटर खाजगी तत्त्वावर सुरू केला जाणार असून त्यासाठी पालिकेची जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.त्यामुळे यातून मिळणाऱ्या निधीचा फायदा नगरपालिकेला सुद्धा होणार आहे,असे श्री.परब यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments