बांदा शहरासाठी कायमस्वरूपी पोलीस पाटील द्या…

2

साईप्रसाद कल्याणकर; अन्यथा मोफत व शेवटपर्यंत आपली काम करण्याची तयारी

बांदा.ता,०६: येथे कायमस्वरूपी पोलिस पाटील देण्यात यावा ते शक्य नसेल तर आपण फुकट काम करण्यास तयार आहे.अशी भूमिका येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर त्यांनी व्यक्त केली आहे.याबाबत त्यांनी प्रांत अधिकार्‍याकडे अर्ज देऊन आपले म्हणणे सादर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार बांदा गावचे पोलीस पाटील सहा महिन्यापूर्वी निवृत्ती झाले. मात्र अद्याप पर्यंत त्या ठिकाणी दुसरी व्यक्ती देण्यात आलेली नाही. बांदा येथे पोलीस स्टेशन असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस पाटील नेमण्याची तजवीज नाही. असे प्रशासनाचे म्हणणे मात्र या निर्णयामुळे लोकांची कामे गेले पाच महिने रेंगाळली आहेत.
याबाबत अर्ज करून सुध्दा अदयाप पर्यंत उत्तर देण्यात आलेले नाही.त्यामुळे आपल्याकडे ही जबाबदारी दिल्यास आपण शेवटपर्यंत आणि मोफत काम करण्यास तयार आहोत असे त्यांनी अर्जात म्हटले.

0

4