कोल्हापूर आर्किटेक्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला बालदशावताराचा आनंद…

2

वेंगुर्ले शाळा नं.४ च्या विद्यार्थ्यांनी सादर केला “कृष्ण हनुमान युद्ध” नाट्यप्रयोग…

वेंगुर्ले.ता.६ कोल्हापूर येथील आर्किटेक्ट कॉलेज च्या विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून शाळा वेंगुर्ले नं.४ च्या विद्यार्थ्यांनी सागरेश्वर बीच येथील सन अँड सॅम रिसॉर्ट येथे *कृष्ण हनुमान युद्ध* हे बालदशावतार सादर केले. कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांसाठी दशावतार हा अत्यंत नवीन आणि उत्सुकता वाढवणारा प्रयोग होता. हे विद्यार्थी दशावतार च्या माध्यमातून सिंधुदुर्ग ची संस्कृती पाहताना भारावून गेले.
आंतरारष्ट्रीय पाणथळ जागा दिवस(wetland day) साजरा करण्यासाठी कोल्हापूर हुन आलेल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बेर्डिंग हाऊस च्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या विद्यार्थ्यानी शाळा वेंगुर्ला नं ४ ला भेट दिली. विद्यार्थ्यांशी पाणथळ जागा संवर्धनाबाबत चर्चा करून त्याचे उपयोग आणि महत्व समजावून घेतले. कार्यक्रमाचे उद्घाटन बॅ. खर्डेकर कॉलेज चे प्राचार्य श्री.विलास देऊलकर ह्यांच्या हस्ते झाले, ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ले नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. वैभव साबळे उपस्थित होते. सोबत प्राध्यापक श्रीम.पाटील, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.वासुदेव परब, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम,संध्या बेहेरे,शिक्षक श्री संतोष परब आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेनंतर सायंकाळी या विद्यार्थ्यांनी बाल दशावतार नाटकाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी लहान विद्यार्थ्यांच्या केलेचे भरभरून कौतुक केले व असा नाविन्यपूर्ण अनुभव दिल्याबद्दल शाळेचे आभार मानले. कृष्ण हनुमान युद्ध ह्या बालदशावतारसाठी शाळेचे शिक्षक श्री संतोष बोडके ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे बालदशावतार आर्किटेक कॉलेज च्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तर आवडलेच पण सोबत हॉटेल सन अँड सॅम चे संचालक श्री.फर्नांडिस हे नाटक बघून एवढे प्रभावित झाले की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना एक दिवस सहभोजनासाठी सुद्धा निमंत्रित केले. गुणवत्ता,क्रीडा कला ह्यासोबतच शाळा वेंगुर्ले नं.४ आपला सांस्कृतिक वारसा सुद्धा जपत आहे ह्यासाठी सर्व थरातून शाळेचे कौतुक होत आहे.

 

12

4