सिंधुदुर्गनगरी.ता,०६: पालघर जिप अध्यक्ष सुरेश खरवटे यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिप पदधिकाऱ्यांची टीम तिन दिवशीय सिंधुदुर्ग जिल्हा अभ्यास दौऱ्यावर आली आहे. ही टीम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विविध योजना, नविन्यपूर्ण उपक्रम आणि विकास कामे यांची माहिती घेणार आहे.
पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश खरवटे, उपाध्यक्ष नीलेश गंधे, समाज कल्याण सभापती दर्शना धुमाडे, महिला व बाल विकास सभापती धनश्री चौधरी, कृषी सभापती अशोक वडे आदिं सह जिप सदस्य तिन दिवसाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अभ्यास दौऱ्यावर आले आहेत. ही टीम 8 फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यात असणार आहे. ही टीम आज दुपारी सिंधुदुर्ग जिप भवनात दाखल झाली. सिंधुदुर्ग जिप च्या अध्यक्षा समिधा नाईक, सीईओ डॉ हेमंत वसेकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती सावी लोके, रविंद्र जठार, माधुरी बांदेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी या टिमचे स्वागत केले.
त्यानंतर पालघर जिप च्या पदधिकाऱ्यांनी जिप भवनाची पाहणी केली. तसेच जिपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत जिपने राबविलेल्या नाविन्य पूर्ण उपक्रमांची, योजणांची माहिती घेतली. जिपने राबविलेल्या कृषि प्रदर्शन, एज्युकेशन एक्स्पो, उत्कर्षा प्लस योजनेचे कौतुकही केले. येथील नविन्यपूर्ण उपक्रम आणि योजना पालघर जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे पालघर जिप अध्यक्ष श्री खरवटे यांनी यावेळी स्पष्ट केले. ही टीम 8 फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यात राहणार असून जिपच्या कामांची आणि विकास कामांची पाहणी करून माहिती घेणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अभ्यासासाठी पालघरची टीम सिंधुदुर्गात दाखल…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES