Wednesday, May 21, 2025
Google search engine
HomeUncategorizedकणकवली पिटर इंग्लंड चोरी प्रकरणी चौघांना पोलिस कोठडी...

कणकवली पिटर इंग्लंड चोरी प्रकरणी चौघांना पोलिस कोठडी…

कणकवली, ता. 6 ः शहरातील मुंबई गोवा महामार्गावरील पिटर इंग्लंड शो रूम मधून रोकड आणि ब्रँडेड कपड्यांची चोरी केल्या प्रकरणी चौघांना 12 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजापूर पोलिसांकडून ताबा मिळाल्यानंतर या चौघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये महंम्मद करीम शेख (वय 19), रिजवान मोहम्मद खान (वय 27), मुमताज मिरहान शेख (वय 28) आणि एजाज अली सफार खान अली (वय 25, सर्व रा. ठाणे) यांचा समावेश आहे. 21 जानेवारीला पहाटे 4 च्या सुमारास ही चोरी झाली होती.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांवर दिवा, पनवेल, ठाणे या परिसरामध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. राजापूर येथील चोरी प्रकरणी तेथील पोलिसांनी वरील चौघा संशयितांना मुंब्रा येथून ताब्यात घेतले होते. या तपासावेळी या संशयितांनी कणकवली शहरातील पीटर इंग्लंड शोरूममध्ये चोरीची कबूली दिली होती. राजापूर पोलिसांकडून या संशयितांचा ताबा आज कणकवली पोलिसांनी घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments