देवली ग्रामपंचायतीचा आनंद मेळावा उत्साहात…
मालवण, ता. ६ : देवली गावातील सर्व प्राथमिक शाळा, पालक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांचा एकत्रित आनंद मेळावा पूर्ण प्राथमिक शाळा काळेथर येथे देवली ग्रामपंचायतीच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी घेतलेल्या ‘खेळ पैठणी’च्या स्पर्धेत कर्मचारी महिलांमधून मिनल आचरेकर व ग्रामस्थ महिलामधून रोशनी वाक्कर या पैठणीच्या मानकरी ठरल्या.
ग्रामपंचायत देवली व तंटामुक्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देवलीतील महिला ग्रामस्थ व विद्यार्थी स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी सरपंच गायत्री चव्हाण, उपसरपंच भाऊ चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, माजी सरपंच विजय चव्हाण, श्यामसुंदर चव्हाण, ग्रामसेवक श्रीमती एम. एम. गोसावी आदी उपस्थित होते. काळेथर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. फर्नांडिस यांनी आभार मानले.
या सर्व स्पर्धांचा बक्षीस समारंभ जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य भाई गोवेकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी सभापती मनीषा वराडकर यांच्या हस्ते पार पडला. महिला स्पर्धा व आनंद मेळाव्याचे हे १२ वे वर्ष होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिनल आचरेकर, वेदा मातोंडकर, गणपत चव्हाण, रघुनाथ चव्हाण, मुख्याध्यापक कृष्णा गोसावी, सौ. हाजू, श्रीमती फर्नांडिस, श्रीमती म्हापणकर, पाडगावकर यांच्यासह देवली गावातील सर्व महिला ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.