Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedसावंतवाडी कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांच्यासह अन्य एकावर खुनाचा गुन्हा दाखल...

सावंतवाडी कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांच्यासह अन्य एकावर खुनाचा गुन्हा दाखल…

सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.०६:कारागृहातील कैदी राजेश गावकर यांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याचा ठपका ठेवून सावंतवाडी कारागृहातील तत्कालीन अधीक्षक योगेश पाटील यांच्यासह अन्य एका कर्मचाऱ्यांवर आज येथील पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.झीलबा पांढरमिसे,असे दुस-याचे नाव आहे.याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.
यात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदी राजेश गावकर यांच्या खुनाला पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते तथा प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला होता संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार चौकशी सुरू होती आज सायंकाळी उशिरा याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबतची अधिक माहिती पोलीस निरीक्षक धनावडे यांनी दिली.ते म्हणाले,सावंतवाडी कारागृह अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पाटील यांच्या विरोधात तक्रार होती.त्याने राजेश गावकर याला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला,असा कुटुंबीयांचा आरोप होता. दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याला कोणत्या तरी वस्तूने मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार आज हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान याप्रकरणी उद्या संशयित पाटील यांच्यासह पांढरमिसे या दोघांना अटक करण्यात येणार आहे.यापुढचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments