योगेश पाटीलच्या अन्य कारनाम्यांच्या चौकशीची मागणी करणार…

2

गुरूदास गवंडे;पोलिस अधीक्षक,निरीक्षकांचे मनसेकडुन कौतुक…

सावंतवाडी ता.०७: केवळ “घंटा नाद” आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे सावंतवाडी कारागृहाच्या अधीक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला,हे मनसेचे यश आहे.आता पाटील यांच्या अन्य कारनाम्यांची चौकशी करण्याची मागणी आम्ही करू,असा इशारा आज येथे आयोजित पत्रकार परिषद मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिला.दरम्यान या गुन्ह्याचा योग्य पद्धतीने तपास करून संशयितांवर गुन्हा दाखल करणाऱ्या सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे,उपविभागीय अधिकारी व पोलिस अधीक्षकांचे यावेळी मनसेकडून कौतुक करण्यात आले.
येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री.गवंडे यांनी याबाबतची माहिती दिली.यावेळी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार,तालुका सचिव विठ्ठल गावडे,संतोष भैरवकर आदी उपस्थित होते.
यावेळी गवंडे म्हणाले, माजी आमदार तथा मनसेचे नेते परशुराम उपरकर यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस याप्रकरणाची चर्चा सुरू होती.त्याला प्रत्यक्षात आणण्याचे काम श्री.उपरकर यांनी केले त्यानंतर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी वरिष्ठ कारागृह अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वाचा मिळू शकली,त्यानंतर आता या सर्व प्रकरणाचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे.

5

4