माणगाव ता.०७:माजी खासदार निलेश राणे यांच्यासह युवा नेते विशाल परब यांचे कट्टर समर्थक असलेल्या श्रावण धुरी यांची आज माणगाव उपसरपंच निवड झाली.मावळते उपसरपंच सचिन धुरी यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याठिकाणी रिक्त पदासाठी ही पोटनिवडणूक लागली होती.दरम्यान या निवडणुकीत १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी श्री.धुरी यांनी एकच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
यावेळी उद्योजक विशाल परब,भाजपचे सरपंच जोसेफ डॉन्टस,मोहन सावंत,दत्ता कोरगावकर,कृष्णा सावंत,वैभव परब ,राजीव भोसले ,आबा कुबल ,प्रदीप सावंत, कृष्णा धुरी दीपक नानचे,गुरु माणगावकर दीपक कानेकर ,सचिन परब सचिन धुरी आदी उपस्थित होते.