पालकमंत्री उदय सामंत यांचा १० फेब्रुवारीला सिंधुदुर्ग दौरा..

2

सिंधुदुर्गनगरी.ता,०७: राज्‍याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 10 फेब्रुवारी 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्‍या दौऱ्यावर येत असून त्‍यांचा जिल्‍हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 7.30 वा. शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथऊन मोटारीने कणकवली, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी 10.00 वा. उपजिल्हा रुग्णालय, कणकवली,येथील किडनी डायलेसीस यंत्राच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10.30 ते 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, अधिक्षक अभियंता, महावितरण, कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणीपुरवठा, राज्य मार्ग परिवहण महामंडळाचे विभाग नियंत्रक, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी व संबंधित सर्व अधिकारी यांच्या समवेत मुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक, 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, कणकवली येथून मोटारीने आंगणेवाडी, ता. मालवण कडे प्रयाण, दुपारी 12.15 ते 1.15 वा. मुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्यासंदर्भात आंगणेवाडी येथे भेट, व पाहणी, 1.15 वा. आंगणेवाडी येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण, दुपारी 2.00 ते 3.00 शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे आगमन व राखीव, दुपारी 3.00 ते 4.00 वा. जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत नियोजन समितीच्या सभागृहात, 26 जानेवारी 2020 रोजीच्या उपोषणकर्त्यांच्या निवेदनासंदर्भात संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक, दुपारी 4.00 ते 5.00 व जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख, उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुख्यधिकारी वेंगुर्ला नगरपरिषद व संबंधित अधिकारी यांच्या समवेत वेंगुर्ला निशाण प्रकल्प व पाणी पुरवठा योजना टप्पा 2 बाबत आढावा बैठक, सायं. 5.00 ते 7.00 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक, सायं. 7.00 ते 8.00 शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे राखिव, रात्री 8.00 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथून मोटारीने सिंधुदुर्ग रेल्वे स्थानककडे प्रयाण, रात्री 8.29 वा. सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक येथून कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

 

8

4