Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या"कोरोना"च्या पार्श्वभूमीवर जिल्हयाची आरोग्य यंत्रणा सतर्क...

“कोरोना”च्या पार्श्वभूमीवर जिल्हयाची आरोग्य यंत्रणा सतर्क…

धनंजय चाकूरकर;योग्य ती खबरदारी घेण्याचा नागरीकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी.ता,०७:  चीन मध्ये उद्भवलेल्या कोरोना वायरस आजाराबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून या आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होवू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. या आजाराने जनतेने घाबरुन न जाता जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी केले आहे.
कोरोना वायरस जिल्ह्यात नाही परंतु हा संसर्गजन्य आजार असल्याने अन्य राज्यात प्रवास करणाऱ्यां कडून हा आजार जिल्ह्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आजारावर जिल्ह्यात जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार, प्रतिकारशक्ती कमी आदि लक्षणे दिसून आल्यास रुग्णांनी सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत. असे आवाहन डॉ धनंजय चाकुरकर यानी केले आहे.
ही घ्यावी खबरदारी
श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तीचा संपर्क टाळावा, हातांची नियमित स्वच्छ्ता ठेवावी, न शिजलेली मांस खाऊ नये, फळे भाज्या न धुता खाऊ नये, खोकतान शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा तसेच टिशू पेपर वापरला असल्यास ती इतरत्र न टाकता कचरा कुंडित टाकण्यात यावा अशी करोना विषाणु प्रतिबंधक खबरदारी घेण्यात यावी असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चाकुरकर यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments