सबळ पुराव्याअभावी मुक्तता; जप्त केलेली रक्कम परत करण्याचे आदेश…
वेंगुर्ले : ता.७
पाच वर्षापुर्वी वेंगुर्ले म्हाडा कॉलनी येथे जुगारअड्डयावर धाड टाकून पोलीसांनी अटक करुन गुन्हा दाखल केलेल्या ३१ आरोपींची वेंगुर्ले न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच या घाडीत जप्त केलेल्या रकमेपैकी ७ लाख १५ हजार ९२० रुपये संबंधिताला परत करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आरोपींच्या वतीने ऍड. प्रथमेश नाईक यानी काम पाहिले.
१५ ऑगस्ट २०१४ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधिक्षक साहू मॅडम यानी कॅम्प येथील एका शेडमध्ये अचानक धाड टाकून जुगाराच्या साहित्यांसह, मुद्देमाल आणि रोख रक्कम ८ लाख १९ हजार १२० रुपये, तसेच संतोष गुरुनाथ नाईक, जयेश नामदेव दळवी, शंकर आlमाराम परब, संदेश लश्मण कोचरेकर, श्रीकृष्ण शंकर भोगटे, राकेश भरत परब, गोरख मनोहर शारबिद्रे, विल्यम फ्रासीस बोरजेस, बसिर सय़यद शेख, रुपेश रमेश सावंत, रविद्र आlमाराम सावंत, अमित दिलीप जोशी, भुषण दिपक ढवळे, अंकुश बाबा निकम, ओमकार विष्णु मुडये, ज्ञानेश्वर वासुदेव हुले, रमेश धाकू निकम, पाडुरंग बापू पवार, प्रकाश सहदेव देसाई, लश्मण सदानंद म्हाडदळकर, सत्यवान महोदव हरमलकर, सुनिल सखाराम म्हाडगुत, संजय आनंद केरकर, रत्नाकर अनंत मोर्ये, प्रसाद बाळकृष्ण मराठे, दिलीप मधुकर वेंगुर्लेकर, कमलाकर भिवा सरमळकर, भरत गणेश परब, शेखर लश्मण गोळवणकर, यशवंत भास्कर परब, आणि शैलेश उर्फ कुमा गुंडू गावडे या ३१ जणाना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी वेंगुर्ले न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाकडुन सबळ पुरावे सादर न झाल्याने वेंगुर्ले न्यायालयाचे न्यायाधिश वि. द. पाटील यानी सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. दरम्यात आरोपींच्या वतीने युक्तीवाद करताना एड. प्रथमेश नाईक यानी सदर घटनेवेळी जप्त केलेली रक्कम कुमा गावडे याची वैयक्तिीक आहे. त्याचा जुगाराशी संबंध नाहि असा युक्तीवाद केला. तो ग्राह्य मानून जप्त केलेल्या रकमेपैकी ७ लाख १५ हजार ९२० रुपये संबंधिताना परत करण्याचे आदेश दिले आहेत.