वेंगुर्ले सभापतींनी घेतली कोरोना संदर्भात माहिती…

2

रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पोर्ट लिमिटेडला दिली भेट

वेंगुर्ले.ता.७: 
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केली आहे यातच वेंगुर्ले रेडी गावात परदेशी मालवाहू जहाज दाखल झाले आहे यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
या बाबत वेंगुर्ले पंचायत समिती सभापती सौ अनुश्री कांबळी,उपसभापती श्री सिद्धेश ऊर्फ भाई परब,पंचायत समिती सदस्या सौ साक्षी कुबल यांनी आज सकाळी तात्काळ रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देत तेथे उपस्थित असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी सौ अश्विनी माईणकर यांच्याकडून रेडी येथे दाखल झालेल्या जहाजातील माणसांची आरोग्य तपासणी कधी व कशी केली तसेच या व्हायरस वर प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करण्यातआल्या तसेच येथिल नागरिकांत याबाबत काळजी घेण्यासंदर्भात आणि जनजागृती संदर्भात काय प्रयत्न करण्यात येत आहेत याची माहिती घेतली तसेच रेडी पोर्ट लिमिटेड च्या कार्यालयात भेट घेऊन संबधित जहाज कोणत्या देशातुन आले त्यात किती माणसे आहेत ती कोणकोणत्या देशातील आहेत तसेच त्यांची आरोग्य तपासणी कधी करण्यात आली तसेच या परदेशी माणसांचा थेट संबंध येथिल गावाशी येणार आहे का, यासंबंधी माहिती घेतली.
यावेळी आरोग्य अधिकारी सौ माईणकर तसेच रेडी पोर्ट लिमिटेड चे अधिकारी शेणाँय यांनी सदर जहाजावर असलेली माणसे यांची तपासणी केली असता एकही माणुस कोरोना व्हायरस संशयित म्हणून आढळून आलेला नाही असे स्पष्ट केले यावेळी सभापती सौ कांबळी यांनी येथिल लोकांना आजार,लक्षणे,माहिती व आरोग्य विषयक माहिती देण्याची तसेच या संदर्भातील आवश्यक असलेला औषध पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा अशा सुचना केल्या आहेत.

1

4