Sunday, December 14, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यारात्रीस खेळ चालेची टीम उद्या अवतरणार युवा महोत्सवात...

रात्रीस खेळ चालेची टीम उद्या अवतरणार युवा महोत्सवात…

 

अण्णा नाईक, शेवंता, दत्ता यांची प्रमुख उपस्थिती…

मालवण, ता. ७ : आमदार वैभव नाईक पुरस्कृत आमदार चषक युवा महोत्सवाचा सांगता सोहळा उद्या ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स. का. पाटील महाविद्यालय मालवण येथे होणार आहे. यावेळी खास आकर्षण म्हणून झी मराठी चॅनेल वरील रात्रीस खेळ चाले या मालिकेचे फेम अण्णा नाईक, शेवंता, दत्ता नाईक हे उपस्थित राहणार असून ते स्पर्धकांना प्रोत्साहित करणार आहेत. यामुळे युवा महोत्सव अधिकच रंगतदार होणार आहे.
युवा महोत्सवात वैयक्तिक गायन, मिमिक्री, काव्यवाचन, ग्रुपडान्स, रॅम्प वॉक या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांचे उदघाटन शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते तर रुची राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतील या आगळ्यावेगळ्या युवा महोत्सवास रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments