Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याडोंगरपाल येथे उद्या सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव...

डोंगरपाल येथे उद्या सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव…

बांदा.ता,०८:  प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डोंगरपाल गावातील श्री सिद्धेश्वर महापुरुष देवस्थान येथे रविवार दिनांक ९ रोजी भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डोंगरपाल येथिल सिध्दाचा डोंगर याठिकाणी सुमारे ३०० वर्षापूर्वी एक सिध्द योगी महापुरुषांनी जिवंत समाधी घेतली होती. या डोंगरावर त्यांची समाधी मंदिर असून दरवर्षी माघ पौर्णिमेला डोंगरपाल ग्रामस्थांच्या वतीने येथे भंडारा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात दर्शनासाठी, नवस करण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी गोवा व महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात.
रविवार दि. ९ रोजी सकाळी १० वाजल्यापासून विविध धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे. ११ वाजता समाधीची पुजाअर्चा व अन्य धार्मिक विधी होतील. दुपारी १२ ते ५ ओट्या भरणे, सायं. ७ ते ८ नवस करणे, नवस फेडणे, गाऱ्हाणी घालणे, रात्रो ८ ते ९ भजन, ९ ते ११ पावणी व रात्रौ ११ ते १२ महाप्रसाद होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन डोंगरपाल ग्रामस्थांच्यातीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments