सावंतवाडी ता.०८: अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी बेळगाव,गोकाक येथील मायाप्पा लक्ष्मण हेगडे याची जिल्हा न्यायालयाने पंचविस हजाराच्या सशर्थ जामीनावर मुक्तता केली आहे.याकामी अँड.सुहेब डींगणकर यांनी काम पाहिले.
ही घटना गेल्या वर्षी २० जून ला घडली होती.यातील संशयितांने कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिला आपल्या जाळ्यात ओढले होते.तसेच तिला पळवून नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.दरम्यान याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.तो सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत होता.
याप्रकरणी संशयिताकडुन साक्षीदारावर दबाव शक्यता असल्यामुळे त्याला जामीन देण्यात येऊ नये,अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती. परंतु तपास काम पूर्ण झाले आहे,असा युक्तिवाद करून त्याला जामीन मंजूर करण्याची मागणी आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आली. त्यानुसार हे प्रकरण संपेपर्यंत कणकवली तालुक्यात जाऊ नये व दर महिन्यात पोलीस ठाण्यात हजेरी लावेल या अटीवर संशयिताला सशर्थ जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी जामीन मंजूर…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES