Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोलगाव येथे पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा...

कोलगाव येथे पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा…

संशयिताचे पलायन; जुगाराचे साहीत्य मात्र जप्त करण्यास यश

सावंतवाडी.ता,०८: कोलगाव येथे आज सावंतवाडी पोलिसांकडून जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली.क्रीकेट स्पर्धेचे निमित्त करून काही युवकांकडुन हा जुगार मांडण्यात आला होता.मात्र पोलिसांची चाहूल लागण्यापुर्वी तेथे असलेल्या शंभरहून अधिक युवकानी पलायन केले. त्यामुळे त्याठिकाणी धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांना माघारी परतावे लागले.त्यात दोन जुगार खेळण्याची पाले व अन्य साहीत्य जप्त करण्यात आल्याची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार श्री लोंढे यांनी दिली.
ते म्हणाले याबाबतची माहिती तेथील काही ग्रामस्थांकडून देण्यात आली होती.त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली.परंतु कर्मचारी जाण्यापूर्वी जुगार खेळणारे पळून जाण्यात यशस्वी झाले,असे लोंढे यांचे म्हणणे.पोलीस ठाण्यात काही दाखल नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments